breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकासआघाडीवर घणाघात
मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सरकारची स्थिती अनिर्णायकी आहे. मंत्रिमंडळातील मंत्री काय करतात याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्ता नसतो तर मुख्यमंत्री काय सांगतात त्याकडे मंत्र्यांचे लक्ष नसते, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.