breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिखली ‘घरकुल’ला स्वर्गीय गोपिनाथ मुंडेचा नाव देण्यास रहिवाशांचा विरोध

 महापालिकेसमोर घरकुलवासियांचे आंदोलन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीत उभारण्यात आलेल्या घरकुल प्रकल्पास स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांचे नाव देण्यास तेथील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. या विरोधात घरकुलवासियांना आज (सोमवारी) महापालिकेसमोर आंदोलन केले. तसेचघरकुल नवनगर संकल्पअसे सर्वसमावेशक नाव देण्याची मागणी त्यांनी केली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएमअंतर्गत चिखली येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी गृहप्रकल्पाचे बांधले जात आहेत. 160 इमारती उभारुन सहा हजार 720 सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 124 इमारतींची उभारणी झाली असून त्यामध्ये पाच हजार 208 लाभार्थी राहत आहे. उर्वरित प्रकल्पाचे काम सुरु असून हा प्रकल्प ‘घरकुल’ या नावाने ओळखला जातो

या प्रकल्पाचे नामांतरण करण्याचे सत्ताधारी भाजपच्या विचाराधीन आहे. घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ करण्याचा विचार आहे. परंतु, या नामकारणाला घरकुलवासियांनी विरोध दर्शविला आहे. घरकुलवासियांना विश्वासात न घेता नामांतरणाचा घाट घातला जात आहे. ही एकधिकारशाही आहे. फेडरेशन आणि घरकुलधारकांना गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी नितांत आदर आहे. परंतु, भविष्यात या नावावरुन वादविवाद, जातीपातीचे राजकारण होऊ शकते. सलोख्याचे वातावरण दुषित होऊ शकते. त्यामुळे जातीपातीशी निगडीत व्यक्तीचे नाव न देता ‘घरकुल नवनगर संकल्प’ असे सर्वसमावेशक नाव देण्यात यावे, अशी मागणी घरकुलवासियांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button