breaking-newsराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: भाजपाच्या दोन आमदाराविरोधात गुन्हा दाखल

लॉकडाउनमध्ये चिथावणीखोर भाषण दिल्यामुळे राजस्थानमधील भाजपाच्या दोन आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोटा येथील महावीर नगर पोलीस स्टेशनमध्ये रामगंजमंडीचे भाजपा आमदार मदन दिलावर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अन्य एका प्रकरणामुळे जयपुरच्या मानसरोवर पोलीस स्टेशनमध्ये सांगानेरचे भाजपा आमदार अशोक लाहोटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर भाषण करत लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मदन दिलावर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

मदन दिलावर यांच्याविरोधात संजय यादव यांनी तक्रार दाखल केली होती. विशिष्ट समुदायाविरुद्ध चिथावणीखोर भाषण करून करोना आजाराविषयी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिलावर यांचा ९ एप्रिल रोजीचा चिथावणीखोर वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विशिष्ट समुदायाविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य दिलं असून करोना रोगांविषयी गैरसमज पसरवल्याचं दिसत आहे. त्यांच्याविरुद्ध संजय यादव यांनी फिर्याद दिली. त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे रोग कायद्यान्वये शुक्रवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही केस सोपविण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अमृता दुहान यांनी सांगितले.

अशोक लाहोटी यांच्याविरोधात रामचंद्र देवेंद्रा यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्य आणि भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशोक लाहोटी यांच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो असं रामचंद्र देवेंद्रा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button