breaking-newsराष्ट्रिय

छत्तीसगडमध्ये पाच नक्षलवाद्यांना अटक

रायपूर – छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या पथकाने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन ठिकाणांवरून पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने तीन जणांना, तर अन्य दोघांना सुकमा जिल्ह्यात पकडण्यात आले होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

सीआरपीएफच्या एका संयुक्त पथक गस्तीवर असताना कंकिपारा गावातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली. दंतेवाडा जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या कारवाईत पूजा सोधी (24), बामन मुच्छकी (38) आणि हिरमा ऊर्फ कोरम सोढी (37) यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान 2016मध्ये कुन्ना येथे झालेल्या चकमकीत पूजा सोधी जखमी झाला होता. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्या चकमकीत चार माओवाद्यांना ठार मारण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button