breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत 41 राज्यांत वेगाने संसर्ग, सतर्कतेचा इशारा

सात महिन्यानंतरही कोरोनाचा कहर थांबलेला नाही. जगबरात १.३७ कोटींहून जास्त लोक बाधित असून ५.८७ लाख लोकांनी प्राण गमावले. गेल्या चोवीस तासांत २.३४ लाख नवीन रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ७१ हजार ७५० रुग्ण अमेरिकेत आहेत. येथे आठवड्यापासून दररोज ६० हजाराहून जास्त रुग्ण येत आहेत. नियंत्रणासाठी विविध देशांनी लॉकडाऊन केले.

अत्यावश्यक गोष्टींना अनलॉक केल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागला. आता अमेरिका, भारत, ब्राझील व रशिया हॉटस्पॉट ठरले आहेत. चला, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आघाडीच्या दहा देशांची दशा, आव्हाने आणि निपटारा तसे करत आहेत.

अमेरिका : बारा राज्यांनी सवलत घेतली मागे, ४१ राज्यांत इशारा

२८ मार्चपासून लॉकडाऊन, १० एप्रिलपासून ५० पैकी ४० राज्यांत अनलॉक. वाहतूक, सार्वजनिक ठिकाणे खुली. त्यामुळे संसर्ग वेगाने फैलावला. गेल्या २४ तासांत ७१ हजार ७५० रुग्ण आढळले. आतापर्यंत १२ राज्यांनी सवलत मागे घेतली. ४१ राज्यांत वेगाने फैलाव. तेथे आणीबाणी लागू.

मेक्सिको : लॉकडाऊनमध्ये विलंब, अनलॉकमध्ये घाई, तीनपट वाढ

२३ मार्चला लाॅकडाऊन, १८ मे पासून टप्प्याने अनलाॅक. १५ जूनपासून सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठ सुरू झाली. आठवड्याने दररोज सरासरी ७ हजारांवर रुग्ण आढळले. अनलॉकनंतर ३ पटीने रुग्णसंख्येत वाढ, माजी आरोग्यमंत्री ज्युलिया फ्रँको म्हणाल्या, विलंबाने लॉकडाऊन व अनलॉकच्या घाईने अडचणीत वाढ.

स्पेन : संसर्ग वाढल्याचे पाहून पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन

१४ मार्चला आणीबाणी होती. २१ जूनला हटवली. पर्यटकही भेट देत होते. देशात रोज ७०० रुग्ण आढळले, कॅटेलोनियाच्या पायरेनीज पर्वत क्षेत्रात ८०० रुग्ण आढळले. कोर्टाच्या आदेशावर १५ दिवसांत दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू केला. निगराणीसाठी ४० हजारावर पोलिस तैनात.

द. आफ्रिका : मद्यावरील निर्बंध हटताच सरासरी १२ हजार रुग्ण

२७ मार्चला लॉकडाऊन लागू. १ मे पासून अनलॉक. १ जूनपासून मद्यावरील बंदी हटताच कोरोना रुग्णांत वाढ. आठवड्याने दररोज सरासरी १२ हजार रुग्ण आढळले. १५ ऑगस्टपर्यंत आणीबाणीत वाढ. रात्री रोज संचारबंदी असेल. मद्य विक्री, सामाजिक कार्यक्रमांना पुन्हा मनाई केली.

चिली : कमी संसर्ग असलेली ठिकाणे वगळल्याने जास्त फैलाव

येथे ३ मार्चला पहिला रुग्ण आढळला. २१ मार्चला पहिला मृत्यू. १५ जूनला सरकारने ९० दिवसांपर्यंत निर्बंध लागू केले. परंतु, बाधित भागात सक्ती केली नाही. त्यामुळे संसर्ग वाढला. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. बहुतांश सार्वजनिक ठिकाणे खुली. गेल्या २४ तासांत नवीन रुग्ण नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button