breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#CoronaVirus : पिंपरी-चिंचवड शहरात नवीन चार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने कोरोनाग्रस्त चार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १९ वर्षाच्या एका मुलासह एका महिलेचाही समावेश आहे. शहरात एकूण ५२ कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे.
शहरात कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तरी, काही केल्या ही परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नाही. आज सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत शहरात नवीन चार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी जाहीर केली आहे.