breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#WarAgainstCorona: भोसरीचा ‘अन्नदूत’: लोकसहभागातून ११ हजारहून अधिक कुटुंबांना अन्नधान्य!

– महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोकसहभाग असलेला ‘एक हात मदतीचा’

– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा आदर्शवत उपक्रम

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी लोकसहभागातून शहरातील सुमारे ११ हजारहून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंच्या ‘किट’चे मोफत वाटप केले. महाराष्ट्रातील  उर्वरित २८७ विधानसभा मतदार संघातील आमदारांनी अशाप्रकारे लोकसहभागातून गरजु नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. कारण, लॉकडाउनचा कालावधी वाढल्यामुळे कष्टकरी, रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

          क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा उपक्रमशील नेता अशी ओळख पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी निर्माण केली आहे. इंद्रायणी थडी असो अथवा कुस्ती स्पर्धा…त्याची भव्यता ही लोकसहभागामुळेच अधिक विलोभनीय वाटते. पश्चिम महाराष्ट्रात २०१९ मध्ये पुराने थैमान घातले. त्यावेळी महेश लांडगे आणि टीमने पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातील सर्व सामाजिक संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती आणि अगदी सर्वसमान्य नागरिकांना ‘एक हात मदतीचा’असे आवाहन केले. त्याला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मदत महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पुरग्रस्तांना मिळाली, ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे.

          दरम्यान, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे गेले २४ दिवस संपूर्ण महाराष्ट्रासह देश बंद आहे. संचारबंदी असल्यामुळे कुणालाही अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येत नाही. चाकरमानी, रोजंदारीवर पोट भरणारे कष्टकरी, मजुर अड्डयावरील कामगार, बांधकाम साईटवर काम करणारे कामगार यांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले. त्यामुळे अशा गरजु कुटुंबांना लॉकडाउनच्या काळात मोफत अन्नधान्य संच देण्याचा उपक्रम  महेश लांडगे आणि टीमने हाती घेतला. कोणताही उपक्रम लोकसहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळेच आमदार लांडगे यांनी ‘पुन्हा एक हात मदतीचा’असे आवाहन नागरिकांना केले. त्यालाही पिंपरी-चिंचवड आणि पुणे  परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांनी केलेली मदत आणि स्व:खर्चाने तब्बल ११ हजारहुन अधिक नागरिकांना मदत उभा करण्यात आली. या उपक्रमामुळे एक बाब अधोरेखित झाली की, संकटकाळात लोकसहभागतून मदत उभा करता येते. त्याद्वारे अनेकांना आधार देता येतो.

          वास्तविक, कोरोनामुळेच नाही, तर बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे प्रत्येत तालुक्यात अनेक कुटुंबांना रोजच्या जेवनाची भ्रांत आहे. त्यामुळे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाचे अनुकरण करीत लोकसहभागातून आमदारांनी मदत उभी केल्यास हजारो नागरिकांना ‘आधार’ मिळेल, अशी अपेक्षा सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

‘एम.डी. टीम’मदतकार्यासाठी घेतेय  ‘रिस्क’…

‘पुन्हा एक हात मदतीचा’ या उपक्रमासाठी शिवांजली सखी मंच, अविरत श्रमदान, महेश दादा स्पोर्ट फौंडेशन, भाजपाचे सर्व नगरसेवक तसेच नारळ ग्रुपचे कोरोना विषाणुची भीती असतानाही जीवाची पर्वा न करता अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करीत आहेत. अडचणीत असलेले नागरिक हे आपल्या परिवाराचा एक भाग आहेत, अशा विचाराने मदतकार्य सुरू आहे.

‘ पुन्हा एक हात मदतीचा’ या उपक्रम दृष्टीक्षेपात…

 १. आतापर्यंत ११ हजार ३०० गरजू कुटुंबांना शिधा वाटप.

२. दररोज सुमारे १००० गरजू कुटुंबांना दोनवेळचे जेवण.  

३. अविरत श्रमदान, शिवांजली सखी मंच आदी संस्था, संघटनांचा सहभाग.

४. आमदार कार्यातील प्रतिनिधींकडून नागरिकांशी सकारात्मक समन्वय.

५. स्वयंसेवकांकडून किराणा  व भाजीपाला मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंगबाबत जनजागृती.

६. ‘मोबाईल व्हॅन’द्वारे नागरिकांचे मोफत मेडिकल चेकअप.

विशेष म्हणजे, माजी सैनिक फाउंडेशनच्या पुढाकाराने दररोज किमान १ हजार नागरिकांना मोफत अन्न वाटप केले जाते. तीन ठिकाणी चालणारा हा उपक्रम कुंदन लांडगे यांच्या नियंत्रणाखाली चालवला जातो. तसेच, डॉक्टर सेलच्या वतीने आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button