breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मॉर्निंग वॉकला निघालेल्या दहाजणांवर पोलिसांची कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

संचारबंदी लागू असताना मॉर्निंग वॉक, कुत्रा फिरविण्यासाठी तसेच मास्क न वापरणाऱ्या दहा जणांवर शुक्रवारी (दि. १७) निगडी पोलिसांनी कारवाई केली.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ३ मे पर्यंत लॉक डाऊन घोषित केले आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली असून संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. असे असतानाही भाजी, किराणा, औषध आणण्याच्या नावाखाली दिवसभर नागरिकांचा रस्त्यावर राबता असतो. शुक्रवारी सकाळी निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉक, कुत्रा फिरवणे तसेच मास्क न वापरता घराबाहेर पडलेल्या दहा जणांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली.

नियम मोडणाऱ्या या नागरिकांच्या हातात करोना विषयक मजकूर असलेला फलक देऊन त्यांना जनजागृती करण्यास भाग पाडले. निगडी पोलिसांच्या या कारवाईमुळे विनाकारण मोकाट फिरणाऱ्या शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button