breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | पालघर जिल्ह्यात सारीच्या रूग्णांची संख्या 300 वर

पालघर | जिल्ह्यात सारीच्या रूग्णांची संख्या 300 वर पोहोचवी आहे. तर , तर195 कोरोना रुग्ण कोरोना बाधितांची संख्या 195 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई लगतच असलेल्या पालघर जिल्ह्यात कोरोनासह सारीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

जिल्ह्यातील एकमेव असलेल्या वसई – विरार महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 168 आहे. पालघर तालुका – 16, डहाणू – 9 आणि वसई ग्रामीणमध्ये 2 रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आणि तलासरी या आदिवासी तालुक्यांमध्ये कोरोणाचा शिरकाव झालेला नाही. मात्र, सारीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3395 रूग्णांचे स्वॅब टेस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये 2964 संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर 236 संशयितांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आतापर्यंत 107 कोरोना बाधितांना बरे करण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button