breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus | मागील 12 तासात नागपूरात आणखी नवे 24 कोरोना रुग्ण
नागपूर | नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 12 तासात 24 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूरात एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 230 झाली आहे. हे 24 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एका दिवसात 68 कोरोना बाधितांची भर पडली. हे सर्व 24 रुग्ण आधीच क्वारंटाईन होते.
यापैकी बहुतांशी नागपुरातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉट सतरंजीपुरा मधील आहेत. त्यापूर्वी काल दिवसभरात 44 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. नागपूरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर नागपूरात आतापर्यंत 3 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे.