breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रक्षाबंधनाच्यादिवशी रेल्वेचा मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई- मध्य रेल्वे प्रशासनाने उद्या रविवार २३ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधन सणा दिवशीच काही तांत्रिक दुरुस्ती कामानिमित्त मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी ९ ते दुपारी ३.५३ यावेळेत लोकल सेवा बंद राहणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या वेळेत सुटणारी डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळविल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानावर येतील. तसेच ठाण्याहून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ पर्यंत सुटणारी अप जलद सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील. पुढे या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानावर पोहोचतील.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक आहे. नेरूळ – बेलापूर-खारकोपर मार्ग वगळता हा मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ४.०१ पर्यंत सीएसएमटीच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. मात्र सीएसएमटी – वाशी मार्गावर ब्लॉक दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button