breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: पंढरपुरात दशक्रिया विधीला बंदी, प्रांताधिकाऱ्याचे आदेश

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या तीरावर दशक्रिया विधी केला जातो. या दशक्रिया विधीला ३१ मार्च अखेर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. तसेच या पूर्वीच  विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या पंढरीत आता शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

तीर्थक्षेत्र पंढरी नगरी करोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट झाली आहे. लाखो वैष्णावांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठलाचे मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आले आहे. मात्र विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे नित्योपचार नियमित सुरु आहेत. या देऊळ बंद मुळे मंदिर परिसर आणि शहरातील व्यापारी वर्गाला फटका बसला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पंढरपूर येथे दशक्रिया विधी करण्यासाठी आंध्रप्रदेश,कर्नाटक आणि राज्यातून भाविक येथे येतात.येथील चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटासमोर हे विधी केले जातात. मात्र या विधीसाठी मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्च प्रयत्न हे विधी बंद ठेवण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

पंढरपुरातील उपजिल्हा रूग्णालय येथे ३१ बेड आणि करकंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १० बेड्सची व्यवस्था केली आहे. जर गरज भासली तर चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्ष उघडण्यात येईल अशी माहिती ढोले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button