breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवडमधील मतदार राजा राष्ट्रवादीने केलेल्या विकासाला मत देईल; आमचा विजय निश्चित ;नाना काटे

राहाटणी पिंपळे सौदागरच्या विकासाचं मॉडेल चिंचवडमधील मतदारांसमोर ठेवणार

अपक्ष उमेदवाराचं कोणतेही आव्हान वाटत नाही

पिंपरी: भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून नाना काटे तर भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक उमेदवार इच्छूक असताना नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 साली नाना काटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यातच आता महाविकास आघाडीकडून नाना काटे यांचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि जे मान्यवर आहेत ते चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदार राजा नक्की विचार करेल की, राष्ट्रवादीच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवडचा विकास कशा पद्धतीने झाला आहे, असं नाना काटे यांनी म्हटलं आहे.

माझा यापुर्वीचा जो वार्ड राहाटणी पिंपळे सौदागरचा चांगला विकास झालेला आहे. हे मॉडेल चिंचवड विधानसभेतील मतदारांसमोर ठेवणार आहोत, असं नाना काटे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस, आरपीआय खरात गट हे सर्व मित्र पक्ष म्हणून आम्ही लढत आहोत. सर्व ताकतीचे कार्यकर्ते आहेत. आजी- माजी नगरसेवक आहेत. पुर्ण क्षमतेने आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आमची लढाई भाजपविरोधात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचं कोणतेही आव्हान वाटत नाही, असं नाना काटे यांनी म्हटलं आहे. बेरोजगारी , भ्रष्टाचार, वाढती महागाई हे जनतेचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुर्वी पाच हजार रूपयांमध्ये आमचं घर चालत होतं. गेल्या पाच वर्षांपासून जनतेचे हाल सुरू आहेत, असा घणाघात नाना काटेंनी भाजपवर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button