TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरजः आमदार सत्यजीत तांबेंचं सूचक वक्तव्य

नाशिकः नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. सत्यजीत तांबे म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांवर राजीनाम्याची वेळ येत असेल, तर काँग्रेस पक्षाने यावर आत्मचिंतन करायला हवे.” ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गतचा संघर्ष चिघळला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थोरातांबरोबर फोनवर झालेल्या चर्चेची माहिती दिली. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

राज्यातील नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हुणे डॉ. सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबे यांच्यावर बंडखोरीचा आरोप झाला. निकालानंतर स्वतः बाळासाहेब थोरात यांनीही सत्यजीत तांबेंबरोबर राजकारण झाल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आणि आता तर त्यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचाच राजीनामा दिला. दुसरीकडे पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबतही अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक, इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नावेने धमकीचा प्रकार, पोलिसांकडून आरोपीला गोवंडीतून २५ वर्षीय तरुणाला अटक, विमानतळ उडवण्याची धमकी आल्यानंतर विमानतळाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये थोरात यांचे भाचे तथा अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी परत एकदा महाराष्ट्राला बदनाम करण्याचे सत्र सुरू केलं आहे. ते विदर्भातून एक प्रकल्प मध्यप्रदेशात निघून गेला, अशी खोटी माहिती पसरवत आहेत. याबद्दलचा एक तरी पुरावा आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवावा.” यावेळी नितेश राणेंनी दावोसच्या संमेलनामध्ये चंद्रपूरमध्ये एक मोठा एमओयू (MOU) झालेला आहे, असाही दावा केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button