breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: न्यूयॉर्क कोरोनाचे प्रमुख केंद्र

न्यूयॉर्क शहर हे जगातील करोनाचे प्रमुख केंद्र असून ८३ लाख लोकसंख्येच्या शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे. शनिवारी रात्रीपर्यंत तेथे  मृतांची संख्या ८६२७ झाली असून रुग्णांची संख्या १,८०,००० आहे. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी देशातील पन्नास राज्यात मोठी आपत्ती जाहीर केली असून अमेरिकेतील ३३ कोटी लोकांपैकी ९५ टक्के लोक घरात बसून आहेत.

ट्रम्प यांनी साठ हजार लष्करी जवान करोनाचा सामना करण्यासाठी तैनात केले आहेत. आमच्या लोकांना वाईट अवस्थेतून जावे लागले पण आम्ही योग्य तेच केले. आता करोनाची उतरण सुरू झाली आहे. मृतांची संख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे. न्यूयॉर्कमध्ये परिस्थिती सुधारत असून लवकरात लवकर देशातील सर्व व्यवहार सुरू करण्याचा विचार आहे असे सांगून ट्रम्प यांनी म्हटले आहे, की अजून तरी व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button