breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: युरोपमध्ये ७५ हजारांहून अधिक मृत्यू

’युरोपमध्ये करोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या ७५ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी ८० टक्के मृत्यू इटली, स्पेन, फ्रान्स व ब्रिटन या देशांमध्ये झाले आहेत.

कोविड-१९ महासाथीचा सर्वाधिक फटका युरोप खंडाला बसला आहे. येथे ९,०९,६७३ लोकांना करोनाचा संसर्ग झाला. ७५,०११ लोक मृत्युमुखी पडले आहेत. जगभरातील करोना बळींची संख्या १,०९,१३३ इतकी आहे. युरोपमध्ये करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेला देश इटली हा असून तेथे १९,४६८ लोक मरण पावले आहेत. स्पेनमध्ये १६,९७२, फ्रान्समध्ये १३,८३२, तर ब्रिटनमध्ये ९८७५ लोकांचा मृत्यू ओढवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button