breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: नवी मुंबईत दिवसभरात 128 नवे कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा 4 हजार 189 वर

नवी मुंबई : नवी मुंबईत काल दिवसभरात 128 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 189 वर पोहोचला आहे. याशिवाय दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत एकूण 129 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

नवी मुंबईतील नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे आणि ऐरोली हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या चारही भागांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या भागात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणं हे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

दिवसभरात कुठे किती रुग्ण आढळले?

बेलापूर – 13
नेरुळ – 16
वाशी – 17
तुर्भे – 22
कोपरखैरणे – 27
घणसोली – 16
ऐरोली – 14
दिघा – 03

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button