breaking-newsताज्या घडामोडीपुणे

हाॅटेलमध्ये पिझ्झा पोहोचवण्याचे काम करणा-या तरुणाची हत्या

सोलापूर |महाईन्यूज|

आमच्या घरातील विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबधाबरोबरच अनैतिक संबंध राजाराम घुगे यांनी ठेवल्याचे आम्हाला सातत्याने खटकत होते. त्या दिवशी देखील आमची याच कारणावरुन बाचाबाची झाली आणि आम्ही रागाच्या भरात धारदार लोखंडी कोयता, लाकडी बाबु, बॅटने जीवे ठार मारल्याची कबुली आरोपी संतोष खंडू गोरे, खंडू सुखदेव गोरे या पिता पुत्रानी सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांना तपासादरम्यान दिली.

पुण्यातील हाॅटेलमध्ये पिझ्झा पोहोचवण्याचे काम करणाऱ्या राजाराम शिवाजी घुगे( रा.लऊळ ता.माढा)यांचा निर्घृण हत्या लऊळ आरोपी गोरे यांच्या शेतात झाल्याची घटना ६ मार्च रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. दरम्यान, या प्रकरणी मयत राजाराम यांच्या भाऊ संभाजी शिवाजी घुगे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत तक्रार दिल्यानुसार लऊळ गावातील संतोष खंडू गोरे व खंडू सुखदेव गोरे या पिता पुत्रावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी पथक तैनात करुन दोघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौकशी दरम्यान, दोघा आरोपींनी राजाराम घुगे यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अविवाहित असलेले राजाराम घुगे पुण्यातील हाॅटेलमध्ये पिझ्झा पोहोचवण्याचे काम करत होते. घुगे व गोरे एकाच गावातील असल्याने त्यांची ओळख होती. ओळखीचे रुपांतर अनेक दिवसांपासून राजाराम घुगे ने गोरे च्या कुटुंबातील विवाहित महिलेशी प्रेम संबधातून वाढत गेले.

हा प्रकार गोरे पिता पुत्रांना पटत नव्हता. या कारणावरुन ७ महिन्यापूर्वी वाद देखील झाला होता. पुण्याहुन नुकताच गावी आलेल्या राजाराम हे गोरे यांच्या घरी आले होते. मयत राजाराम यांची गोरे पिता पुत्राशी तसेच त्या महिलेशी वाद घालत यात बाचाबाची वाढत गेली, आणि गोरे पिता पुत्रानी राजारामची हत्या केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button