breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020: राजस्थानपुढे आज दिल्लीचं आव्हान

शारजाह – आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 23 व्या सामना आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात शारजाह येथे होणार आहे. राजस्थान रॉयल्सवर सलग तीन पराभवानंतर संघातील उणीवा सुधारण्याचा दबाव आहे. आयपीएलच्या विक्रमाविषयी सांगायचे झाले तर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये आतापर्यंत 20 सामने (2008-2019) झाले आहेत. राजस्थानने 11 तर दिल्लीने 9 सामने जिंकले आहेत.

सध्याच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात केली होती आणि शारजाहमध्ये दोन्ही सामने जिंकले होते, परंतु अबूधाबी आणि दुबईसारख्या मोठ्या मैदानावर तिन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा आज ते शारजाहला खेळणार आहेत. इथल्या दोन सामन्यांमधील विजय त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने तिन्ही विभागांत चांगली कामगिरी केली असून पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. राजस्थानला अद्याप सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन सापडलेली नाही. बेन स्टोक्सच्या पुनरागमनाची त्यांना आशा आहे, परंतु 11 ऑक्टोबरपर्यंत तो क्वारंटाईन असणार आहे.

कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनचा फॉर्म अचानक खराब झाला आहे आणि संघात समाविष्ट असलेले भारतीय फलंदाज धावा करण्यास असक्षम आहेत. मुंबई इंडियन्सच्या विरोधात राजस्थानने अंतिम 11 मध्ये यशवी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांच्यासह अंकित राजपूतला मैदानात उतरवले पण ते काही खास करु शकले नाहीत.

दुसर्‍या बॉलवर जयस्वाल खाते न उघडता बाद झाला, तर राजपूतने तीन ओव्हरमध्ये 42 धावांची भागीदारी केली. त्यागीने 36 धावा देऊन एक विकेट घेतली. शेवटच्या सामन्यात जोस बटलरचा फॉर्म परत आला आहे. राजस्थानसाठी ही चांगली गोष्ट आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि टॉम कुर्रेनवर खूप दबाव आहे. तर फिरकी गोलंदाज राहुल तेवतियाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.

दुसरीकडे, दिल्लीचा संघ सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. कर्णधार अय्यर फॉर्मात आहेत तर सलामीवीर पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनीही चांगली कामगिरी केली आहे. मार्कस स्टोइनिसने दोन अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीत कॅगिसो रबाडाने आतापर्यंत 12 विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्तजेने ही चांगली कामगिरी केली आहे. इशांत शर्माच्या जागी आलेल्या हर्षल पटेलने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध 34 धावा देऊन दोन विकेट घेतली, परंतु अखेरच्या सामन्यात 43 धावा दिल्या. अमित मिश्राच्या जागी फिट होऊन आलेला आर अश्विनने 26 धावा देऊन एक विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button