breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: देश कोरोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा काय केलं माहितीये?

जगभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना न्यूझीलंडमधून एक दिलासादायक वृत्त आलं आहे. न्यूझीलंडने सोमवारपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लावलेले सर्व निर्बंध हटवले आहेत. करोनाची लागण झालेला अखेरचा रुग्ण बरा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून करोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

न्यूझीलंडमध्ये आता करोनाचा एकही रुग्ण नसून न्यूझीलंड करोनामुक्त झालं आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, देशाच्या आरोग्य मंत्रालयाकाडून याबाबत माहिती देण्यात आली. “अखेरचा रुग्ण बरा झाला आणि आपण आता करोनामुक्त झालो हे कळल्यानंतर मी माझ्या घरात आपोआप थोड्यावेळासाठी डान्स केला”, असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन म्हणाल्या आहेत. “करोना व्हायरसला सध्यातरी आम्ही न्यूझीलंडमधून हद्दपार केल्याचा विश्वास आहे. देशांतर्गत निर्बंध हटवण्यात आले असले तरी देशाच्या सीमा बंदच असतील”, असंही जसिंडा आर्डेन यांनी स्पष्ट केलंय.

‘न्यूझीलंडमध्ये १७ दिवसांपूर्वी अखेरचा करोनाग्रस्त रुग्ण समोर आला होता. तेव्हापासून आतापर्यंत देशात एकही करोनाग्रस्त रुग्ण निष्पन्न झाला नाही’, अशी माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात १५०० च्या जवळपास लोकांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला. भारतात सध्या करोनाग्रस्तांची संख्या अडीच लाखांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमधून आलेलं वृत्त नक्कीच दिलासादायक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button