breaking-newsपुणे

माजी खासदार संजय काकडे यांनी मेव्हण्याला धमकावल्याचा गुन्हा दाखल

पुणे – माजी खासदार आणि प्रसिद्ध उद्योजक संजय काकडे यांनी आपल्या सख्ख्या मेव्हण्यालाच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

व्यायसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संजय काकडे यांचे मेव्हणे युवराज ढमाले यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ढमाले आणि काकडे यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय सुरू होता. मात्र २०१०पासून दोघे स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. यावरून दोघांत मतभेद आहेत.

२०१८ मध्ये काकडे यांनी ढमाले यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावले होते. ‘तुला संपवायला वेळ लागणार नाही. मी सत्तेत आहे, पाहिजे ते करू शकतो, माझे अनेक गुंडांशी संबंध आहेत त्यामुळे नीट राहा’, अशा शब्दात धमकावले होते. तसेच पुढच्याच महिन्यात पुन्हा काकडे यांनी ‘तुला आणि तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालून संपवेन’, अशी धमकी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button