breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजन पाटलांच्या बढतीसाठी आर्थिक व्यवहार; राष्ट्रवादी नगरसेवकांचे भर सभागृहातून ‘वॉक आऊट’

  • भाजप नगरसेवकांवर मंगला कदम यांचा गंभीर आरोप
  • उपसूचनेद्वारे बढतीच्या विषयाला दिली महापौरांनी मंजुरी

पिंपरी, (महाईन्यूज) – राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा तिव्र विरोध असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता पदावर राजन पाटील यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत उपसूचनेव्दारे मंजूर करण्यात आला. नियमबाह्य पध्दतीने हा प्रस्ताव मंजूर केला असून या सगळ्या प्रकरणात भाजपच्या पदाधिका-यांनी पैसे घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहातून वॉक आऊट केले.

महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेत स्वच्छ भारत अभियानअंतर्गंत सुरू असलेल्या कामाचा अहवाल मंजुरीसाठी होता. त्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपकडून उपसूचना देण्यात आल्या. त्यामध्ये महापालिकेच्या रिक्त झालेल्या शहर अभियंतापदावर राजन पाटील यांना पदोन्नती देण्याचा निर्णय उपसूचनेव्दारे घेण्यात आला. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाच्या विषयाला पदोन्नतीची उपसूचना सुसंगत नाही. ती नियमानुसार नसल्याने चुकीच्या उपसूचना देवू नका. तसेच, त्याचा खुलासा नगरसचिव किंवा आयुक्तांनी करावा, अशी मागणी माजी महापौर मंगला कदम यांनी केली. त्यानुसार महापौरांनी खुलासा करण्याच्या सूचनाही दिल्या. परंतु, भाजपतून सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी राष्ट्रवादीला लक्ष करत उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्याची सूचना केली.

महापौर राहूल जाधव यांनी या विषयाला माजी महापौर मंगला कदम यांचा आक्षेप असताना हा विषय मंजूर केला. त्याला विरोध करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहातून ‘वॉक ऑऊट’ केले. मात्र, नंतर राष्ट्रवादीकडून कदम यांनी सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांवर अधिका-यांना बढती देण्यासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button