#CoronaVirus: देशातील कोरोनाबाधितांची संख्या 27 लाख पार, महाराष्ट्रातील आकडेवारीनं दिला दिलासा
नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 27 लाख 2 हजार 743 झालेली आहे. 24 तासांत 55 हजार 079 नवीन प्रकरणं सापडली तर, 876 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 6 लाख 73 हजार 166 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 51 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 19 लाख 77 हजार 780 रुग्ण निरोगीही झालेले आहेत. यासह देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 73.17% झालेला आहे.
मुख्य म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि बिहारमधील नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्रात सोमवारी 8,493 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6,04,358 झालेली आहे. तर एका दिवसात 11,391 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही 4,28,514वर पोहोचलेली आहे.