breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह AIIMSमध्ये दाखल, श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना AIIMSमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याचे अमित शाह यांना रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली होती, त्यानंतर उपचारानंतर दुसऱ्यांदा चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता.

गेल्या काही दिवसांपासून अमित शाह होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले होते. अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 14 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितलेले होते. शाह यांनी ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिलेली होती. मात्र आता पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button