breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनला धक्का! ज्यावर चीनला होता सर्वात जास्त विश्वास, तोच शक्तीशाली टँक अवघ्या 30 सेकंदातच बुडाला

बीजिंग: जवळजवळ सर्वच देशांशी सीमवाद उकरून काढणाऱ्या चीनला एक मोठा धक्का बसला आहे. एकीकडे चीन आशिया खंडातील, विशेषत: दक्षिण चीन समुद्रामध्ये अनेक ठिकाणी आपला हक्क सांगत आहे आणि दुसरीकडे लष्करी सामर्थ्य दाखवत आहे. यातच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, यात पीपल्स लिबरेशन आर्मीची (PLA) पोलखोल झालेली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये चिनी लष्कराचा अॅंफिबियस रणगाडा पाण्यात बुडताना दिसत आहे. असे म्हटले जात होते की, हा रणगाडा पाण्यात आणि जमिनीत अतिशय सक्षम आहे. मात्र या व्हिडीओमुळे चीनच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत.

या amphibious टँकचे काम पाण्याच्या आत राहून प्रतीक्षा करणे आणि अचानक हल्ला करणे किंवा एखाद्या संशयास्पद वाहनास आवश्यक असल्यास नदी ओलांडण्यापासून थांबविणे हे असते. आता असा आरोप केला जात आहे की, ही टँक तयार करण्यासाठी निकृष्ठ दर्जाचे स्टील वापरण्यात आलेले आहे, त्यामुळे ते पाण्यात बुडालेले आहे.

https://twitter.com/hiro_hamakawa/status/1294486716443549697?s=20

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button