breaking-newsमनोरंजन

२.० चा ट्रेलर ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘२.०’ हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रजनीकांत आणि अक्षय कुमार स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचं दिसून येतं.  नुकतच करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
‘२.०’च्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार कॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

करणने ट्विट करत येत्या ३ नोव्हेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्याने एक फोटोदेखील शेअर केला आहे. त्यामुळे आता हा ट्रेलर कसा असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘२.०’ हा चित्रपट आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे. तब्बल ३५० कोटी खर्चून चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही भूमिका आहेत. ऑस्कर विजेते सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाता संगीत दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button