breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: तीन हजाराहून जास्त कोरोना रुग्ण असणारं महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य

देशातील सर्वात जास्त करोनाबाधित महारष्ट्रात आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्या तीन हजारांच्या पुढे गेली. तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण असणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरलं आहे. सोबतच मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी मुंबईत १७७ नव्या रुग्णांची भर पडली. राज्य सरकारने करोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचं प्रमाण कमी झालं असून रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगितलं आहे.

गुरुवारी राज्यात २८६ करोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढलळल्याने संख्या ३२०२ वर पोहोचली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९४ झाली आहे. मृतांमधील चार जण मुंबई आणि तिघे पुण्यातील होते. यामधील चार रुग्णाचं वय ६० च्या पुढे होतं, तर इतर जण ४० च्या पुढचे होते. यामधील सहा जणांना अस्थमा, उच्च रक्तदाब, डायबेटिस सारखे त्रास होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान राज्यातील सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या मुंबईतही रुग्णांची संख्या २०६३ झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सार्वजनिक आणि खासगी ठिकाणांवर ५६ हजार ६७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधील ५२७६२ लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. महाराष्ट्रात सध्या २९७ सक्रीय कंटेनमेंट झोन आहेत.

डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या एकूण ५६६४ सर्व्हे टीम असून आतापर्यंत २० लाख लोकांचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. उपचारानंतर तीन हजार लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण ७१,०७६ लोकांना होम क्वारंटाउन करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button