breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत आजपासून ‘या’ गोष्टींना परवानगी

राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार आजपासून  म्हणजे 5 जूनपासून महाराष्ट्रात अनलॉकडाउन १.० ला सुरुवात होत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत आजपासून काही गोष्टी सुरु होणार आहेत. बाजारपेठा, दुकानं देखील सुरु होणार आहेत. मात्र याठीकाणी नक्कीच पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. काही गोष्टींचे नियम हे पाळावेच लागणार आहेत. तर मुंबईमध्ये आजपासून नेमक्या कोणत्या गोष्टी सुरु होणार आहेत ते पाहुयात.

1… मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून घेण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता विनापरवानगी देखील प्रवास करता येणार आहे.

2… पहाटे 5 ते रात्री 7 या वेळेत नागरिकांसाठी उद्याने, मैदाने खुली करण्यात आली आहेत. यावेळेत नागरिक व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाहीये.

3… दुकानं देखील सम-विषम नियमाने म्हणजे एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं  आणि  दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकानं पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमांचं पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसंच दुकानं मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घेण गरजेच असणार आहे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचं असणार आहे.

4… कपड्यांच्या दुकान उघडण्यास परवानगी असली तरी दुकानांतील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी मात्र नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. शिवाय कोणत्याही प्रकारचे कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगीही नाकारण्यात आली आह.

5….शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.

6… रविवारपासून म्हणजेच 7 जून 2020 पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

आज पासून नियमावलीत काही गोष्टी मुंबईत सुरु होणार आहेत त्यामुळे मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळणार असला तरी पोलिसांसमोर मात्र मोठं आव्हान असणार आहे.  नियमांची अंमलबजावणी, गर्दीच्या नियोजनासह गुन्हेगारी वाढू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच्या उपाययोजना पोलिसांच्या खांद्यावर असतील. दुकानांत किंवा रस्त्यांवर अधिक प्रमाणात गर्दी होऊ नये किंवा त्यातून कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची परिक्षाच असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button