breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

भारताची पॅलेस्टाइनला सढळ हाताने मदत, औषधांसह पाठवले ३२ टन साहित्य

Israel-Hamas War : हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जगातील अनेक देशांनी गाझामधील लोकांसाठी मदत सामग्री पाठवण्याचं आवाहन केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना फोन करून सीमा उघडण्याचं आवाहन केलं होते, जेणेकरून तेथील लोकांना मदत करता येईल.

यानंतर सुमारे २० ट्रक मदत गाझाला पोहोचवण्यात आली आहे. आता भारतानं पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी मदत पाठवली आहे. भारताने पॅलेस्टाईनमधील लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान इजिप्तच्या अल-अरिश आंतरराष्ट्रीय विमानतळावर मदत सामग्री घेऊन रवाना झालंय.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड-पुणे शहरातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा पिंपळे सौदागरमध्ये

भारतानं या विमानाद्वारे पॅलेस्टाईनमधील लोकांना सुमारे ६.५ टन वैद्यकीय मदत आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य पाठवलं आहे. जीवन रक्षक औषधं, सर्जिकल वस्तू, तंबू, स्लिपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छता सेवा, पाणी शुद्ध करणारी औषधं यासह अनेक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button