breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus | जळगावात कोरोनाचा दहावा बळी
जळगाव | जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सदरील रुग्ण 65 वर्षीय पुरुष असून अमळनेरचा रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे. या रुग्णाला 25 एप्रिलला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
28 एप्रिलला सदरील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं तपासणी अहवालातून समोर आलं होतं. दरम्यान आज या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनामुळं मृत झालेल्या रुग्णांची संख्या आता 10 वर गेली आहे. तसेच आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 31 वर गेला आहे. यापैकी एक जण बरा होऊन घरी परतला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.