breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर आता पोलिसांना सापडले पाय, गूढ अद्यापही कायम

मुंबई | महाईन्यूज

मुंबई पोलिसांना घाटकोपर येथे मृतदेहाचे कापण्यात आलेले पाय सापडले आहेत. ३१ डिसेंबर रोजी घाटकोपर पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचं शीर आणि पायाचा खालील भाग कापलेला होता. कापण्यात आलेले पायाचे भाग पोलिसांना त्याच ठिकाणी शोध घेतला असता सापडले आहेत अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र मृतदेहाचं शीर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

पोलिसांनी सापडलेले पाय शवविच्छेदनासाठी पाठवलेले असून हे त्याच मृतदेहाचे आहेत का याची छानणी केली जात आहे. पोलिसांना महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तो बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेला होता. विद्याविहार येथील एसटी वर्कशॉपच्या बाहेर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आलेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button