breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: चीनमध्ये पहिल्यांदाच गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित एकही नवा रुग्ण आढळलेला नाही

एकीकडे जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना चीनमध्ये मात्र गेल्या २४ तासांत कोरोनाची लागण झालेला एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूच्या संक्रमणाची सुरुवात सर्वात आधी चीनमधून झाली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये चीनमध्ये हजारो नागरिकांना कोरोनाची बाधा सहन करावी लागली होती… मात्र पहिल्यांदाच गेल्या 24 तासात चीनमध्ये एकही कोरोना बाघित रुग्ण आढऴून आलेला नाहीये..त्यामुळे चीनसाठी ही समाधानकाकर गोष्ट म्हणावी लागेल…

जगात आतापर्यंत एकूण दोन लाख १९ हजार नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर ९००० नागरिक यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. चीनमध्ये बुधवारी रात्रीपर्यंत ३४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीतून दिसले. पण हे सर्व नागरिक परदेशातून चीनमध्ये आले आहेत. परदेशात असतानाच त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. चीनमध्ये असलेल्या कोणत्याही नागरिकाला नव्याने कोरोना झाल्याचे बुधवारी रात्री संपलेल्या २४ तासांत आढळून आलेले नाही.

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि उपचार सुरू असलेल्या ८ जणांचा बुधवारी चीनमध्ये मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू वुहान प्रांतातच झाले आहेत. पण बुधवारी वुहानमध्ये कोणत्याही नागरिकाला नव्याने कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button