breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

#CoronaVirus: गुगलचा ‘DO THE FIVE. Help stop coronavirus’ उपक्रम

कोरोना व्हायरसचा वेगाने होणारा प्रसार पाहता त्याला जागतीक महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर यूजर्सना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यासाठी केवळ टेलिकॉम कंपन्याच नाही, तर फेसबूक, युट्यूब आणि गूगलनेही पावले उचलली आहे. 

फेसबूक, गूगल, ट्रविटर, मायक्रोसॉफ्ट, युट्यूब, लिंक्डइन आणि रिडीट या कंपन्याही या व्हायरसशी संबंधित चुकीची माहिती नष्ट करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. तर Google ने ‘DO THE FIVE. Help stop coronavirus’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

गूगलचा उपक्रम –

आपण गूगलवर सर्च करण्यासाठी गेलात तर तेथे आपल्याला ‘DO THE FIVE. Help stop coronavirus’ असे लिहिलेली एक लिंक दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी पाळल्यानंतर तुम्ही व्हायरसपासून सुरक्षित राहू शकता.

या आहेत पाच गोष्टी –

  • थोड्या-थोड्या वेळाने हात धुणे, 
  • खोकलताना तोंडाला हात लावण्याएवडी कोपरा लावणे.
  • नेहमी-नेहमी तोंडाला स्पर्ष न करणे
  • इतरांपासून योग्य अंतरावर राहा
  • आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर घराबाहेर पडू नये

 गुगलचा हा उपक्रम लोकांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 169 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक असला तरी, संसर्गाचे प्रमाण कमी आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 49 रुग्ण आहेत. मात्र यातले ४० रुग्ण परदेशातून राज्यात आले आहेत. या लोकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या केवळ ९ इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यांनी दिली आहे.

त्यामुळे यावरून असं म्हणनं वावग ठरणार नाहीये की फक्त लोक किंवा सरकारनेचं नाही तर सर्व टेकऩॉलॉजीच्या कंपन्यांनीही कोरोनाची गंभीरतचा ओळखून सर्वांना सावध राहण्यासाठी मह्त्त्वाची पावलं उचललेली आहेत…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button