breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus |कल्याण डोंबिवलीत 39 रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण | कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 11 मे रोजी दिवसभरात एकूण 39 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यात डोंबिवली येथील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून ५ रुग्णांना, महापालिकेने कोव्हिड १९ साठी सामंजस्याचा करार केलेल्या होली क्रॉस रुग्णालयातून 2, निऑन हॉस्पिटलमधून १४ आणि टाटा आमंत्रा येथून ५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 11 मे रोजी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार 13 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णाची संख्या १३+२६=३९ इतकी झाली असून आजपर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची ही सगळ्यात मोठी संख्या आहे. आता महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण ३४४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकूण १३० रुग्ण म्हणजेच ३७% रुग्ण उपचारा अंती बरे झाले आहेत. डिस्चार्ज झालेल्या 39 रुग्णांपैकी निऑन रुग्णालयातून डिस्चार्ज झालेले 2 रुग्णांमध्ये डायलिसिस रुग्णांचा व एका गर्भवती महिलेचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button