breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

आम्ही आयुष्यात कधी नव्हे ते राष्ट्रवादीला मतदान केले, आणि तुम्ही…!

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज (८ सप्टेंबर) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. “रामराजे, आज तुम्ही दुजाभावाचा आणि दबावाखाली काम करण्याचा कळस गाठला आहे”, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या विरोधाला न जुमानता सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यास अनुमती दिल्याने चंद्रकांत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची निवड झाली. मात्र, भाजपने या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. तसेच, भाजपच्या सर्व सदस्यांनी सभात्यागही केला.

“४ वर्षांपूर्वी आपणास सभापती म्हणून निवडताना, आयुष्यात राष्ट्रवादीला कधीही न केलेले मतदान आम्ही केले. परंतु, आमचे सरकार असतानाही तुम्ही कधीही आम्हाला सहकार्य केलेले नव्हते. परंतु, आज तर दुजाभाव व प्रभावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे. पण भाजप हा भेदभाव लक्षात ठेवेल. भाजप विरुद्ध तुम्ही कितीही षडयंत्र रचलीत तरीही तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही. आश्चर्य आहे, एक निस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्या बद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितच कमी झाला आहे. असो…राजकारणात हे चालायचंच”, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी रामराजे नाईक-निंबाळकरांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button