breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus:साताऱ्यातील कोरानाबाधितांचा आकडा दोनशेपार

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही 100 च्या वर गेली आहे. जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. पण कोरोनाबाधित रुग्णांमध्ये निम्म्याहून अधिक रुग्ण बरे होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. साताऱ्यात काल (21 मे) 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये खटाव तालुक्यातील सारी आजाराचा एक रुग्ण आहे.

जिल्ह्यात काल सापडलेल्या रुग्णांमध्ये काही रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. एकूण 9 कोरोना रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील आसरे, कोरेगाव तालुक्यातील भीमनगर, सातारा तालुक्यातील आसनगाव-1, रायघर-1, कास खुर्द -1, जावली तालुक्यातील वरोशी-1, गावडी-1, फलटण -2 येथील रुग्णांचा समावेश आहे.

त्याशिवाय खटाव तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील मायणी-1, निमसोड-2, गारेवाडी-1 येथील रुग्ण आहेत. तसेच खटावमध्ये सारीची लागण झालेला एक रुग्ण आहे.

जिल्ह्यात पाटण तालुक्यातील धामणी गावच्या एकाला आणि कराड तालुक्यातील शामगाव येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 201 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 106 जण कोरोनातून बरे झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button