breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शौर्य दिनाचे अभिवादन घरूनच करा

पोलीस व आंबेडकरी कार्यकर्त्यांचे संयुक्त आवाहन

पिंपरी | प्रतिनिधी

भीमा कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारी रोजी प्रत्यक्ष न जाता नागरिकांनी घरूनच अभिवादन करावे, असे संयुक्त आवाहन आंबेडकरी पक्ष, संघटना प्रतिनिधी आणि पोलीस यांच्या बैठकीमध्ये करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी शहरातील विविध पक्षसंघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी हे आवाहन करण्यात आले.

सदर बैठकी मध्ये कोविड 19 चा प्रादुर्भाव कालावधीमुळे यंदाच्या वर्षी भिमा कोरेगावचा उत्सव हा केवळ प्रातिनिधिक स्वरूपात मध्ये करण्यात येणार आहे. या बाबतचे मार्गदर्शक आदेश राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. त्यानुसार केवळ पास धारक व्यक्तींनाच अभिवादनासाठी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाता येणार आहे. अन्य आंबेडकरी अनुयायांनी घरच्या घरीच अभिवादन करावे, असे आवाहन या वेळी सर्वांच्या वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीत पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी राज्य सरकारचे निर्णय व यापूर्वी समाजातील आयोजक पक्ष संघटना व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीबाबत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. या वेळी सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील चंद्रकांता सोनकांबळे, देवेंद्र तायडे, राहुल डंबाळे, बाबा कांबळे, सुवर्णा डंबाळे,  अनिता सावळे, संतोष निसर्गंध, अजीज शेख, सुनील ढसाळ, धर्मपाल तंतरपाळे, कुणाल वावळकर, विनोद चांदमारे, साकी गायकवाड, मनोज गरबडे, संतोष जोगदंड, अजय लोंढे, राजेंद्र साळवे, रमेश चिमुरकर, प्रकाश भूतकर, विष्णु सरपते, आबा रणधीर आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button