पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 61 केंद्रांवर मिळणार कोरोनाची लस

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंध लसीकरण सोमवारी (दि. 28) सुरु आहे. 15 वर्षावरील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि 18 वर्षावरील नागरिकांना कोविशील्डचा पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप पद्धतीने 70 टक्के तर कोविन अॅपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने 30 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. शहरातील 61 केंद्रांवर ही लस मिळणार आहे.

खालील केंद्रांवर मिळणार लस

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, ईएसआयएस हॉस्पिटल, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, चिंचवड स्टेशन दवाखाना, प्रेमलोकपार्क दवाखाना, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, बिलजीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, जुने तालेरा रुग्णालय, मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट क्लीनिक वाल्हेकरवाडी, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, जिल्हा परिषद शाळा ताथवडे, पुनावळे दवाखाना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी, महापालिका कन्याशाळा चिखली,

महापालिका शाळा जाधववाडी, हनुमंतराव भोसले दवाखाना नेहरूनगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, बाबाजी पांडू भांडे पिंपळे निलख दवाखाना, मारुती गेणू प्राथमिक शाळा कस्पटे वस्ती वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, नवीन थेरगाव रुग्णालय, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, महापालिका शाळा वाकड, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, माजी सैनिक भवन दत्तनगर दिघी, सखुबाई गवळी गार्डन भोसरी, पद्मावती मोबाईल कोविड हॉस्पिटल च-होली, जुने भोसरी रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, दिघी विरंगुळा केंद्र, पंडित जवाहरलाल नेहरू शाळा च-होली,

महापालिका बहुद्देशीय तालीम इमारत बोपखेलगाव, गंगोत्री पार्क भोसरी, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, ठाकरे शाळा रुपीनगर, तळवडे समाजमंदिर शाळा, घरकुल दवाखाना चिखली, यमुनानगर रुग्णालय, नूतन शाळा ताम्हाणेवस्ती, विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर, भानसे स्कुल यमुनानगर, काळभोर गोठा बालवाडी यमुनानगर, प्राथमिक शाळा 92 म्हेत्रे वस्ती, महापालिका शाळा रहाटणी, जुने जिजामाता रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, कासारवाडी दवाखाना, दापोडी दवाखाना, अहिल्यादेवी होळकर सांगवी महापालिका शाळा, दीनदयाल शाळा संत तुकाराम नगर पिंपरी, निळू फुले नाट्य गृह पिंपळे गुरव, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button