breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जाधववाडी, चिखलीत पायाभूत सोयी-सुविधांचा ‘खेळखंडोबा’!

स्थानिक नगरसेवकांसह भाजप आमदारांचे दुर्लक्ष; जाधववाडी, चिखलीकर त्रस्त

विकास शिंदे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिखली, जाधववाडी, कुदळवाडीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव दिसून येत आहे. या प्रभागातील अनेक भागात रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. बाह्य व अंतर्गत रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईनसह स्वच्छतागृहांच्या समस्यांनी रहिवाशी त्रस्त आहेत. विशेषता या प्रभागात महापाैर पदाची संधी मिळून देखील समस्या ‘जैसे थे’ आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोनमध्ये चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामासह पत्राशेड मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहे. सदरील बांधकामे व पत्राशेड उभारण्यास स्थानिक नगरसेवकांच्या आर्शिवादाने पाठबळ मिळत आहे. या बांधकामासह पत्राशेडमधून महिनाकाठी लाखो रुपये भाडे वसूल होत आहे. याकडे बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी जाणिवपुर्वक कानाडोळा केल्याने प्रभागाचे विद्रुपीकरण वाढले आहे.

चिखली, जाधववाडी, चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बो-हाडेवाडी, वुड्स व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी या परिसरात विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. बाह्य व अंतर्गत रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईन, उद्याने, क्रिंडागणे यासह सार्वजनिक स्वच्छतागृहाचा देखील अभाव आहे. तेथील नागरिकांना पिण्याचे पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ड्रेनेज व्यवस्था नसल्याने अनेक भागात रस्त्यावरच सांडपाणी पाणी सोडले जात आहे. तसेच कित्येक ठिकाणी पाणी साठून डासा उत्पत्ती होवू लागली आहे. आरोग्य विभागाकडून धुर फवारणी न केल्याने डेंगू, मलेरिया, चिकनगुन्या या साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

प्रभाग क्रमांक दोन परिसरातील बाह्य आणि अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. गेल्या चार वर्षात स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याने रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहे. काही रस्ते अजूनही डांबरीकरण केलेले नाहीत. अनेक गल्लोगल्ली पेव्हींग ब्लाॅक बसविलेले नाहीत. पाणी टंचाईने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक नगरसेवकांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

नाले सफाई न केल्याने ड्रेनेजचे सांडपाणी तुंडूब भरले आहे

नाले साफसफाई व्यवस्थित होत नाही. जाधववाडीच्या नाल्यांचे पाणी वर्षांनूवर्ष तुंबून ठेवले आहे. नाल्यांचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने पाणी जागोजागी थांबून राहत आहे. मलनि:स्सारणचे चेंबर जागोजागी गळती लागली आहे. काही ठिकाणी ते चेंबर तुटल्याने सर्व मैला नाल्यांमध्ये मिश्रण होवून परिसरात दुर्गंधी सुटली आहे. तसेच नऊ कोटी खर्च करुनही नाल्याचे काम अर्धवट राहिले आहे. अनेक भागात पथदिव्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षात नगरसेवकांना योग्य पायाभूत सोयी-सुविधा देता न आल्याने प्रभाग क्रमांक एकमधील मतदारांमध्ये असंतोष पसरला आहे.

मलनि:स्सारणाचे चेंबर अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्यातून नाल्यात मैला वाहून जात असून परिसरात दुर्गंधी सुटली आहे.

जाधववाडी, चिखलीला सक्षम नेतृत्वांची गरज..

चिखली, जाधववाडी, कुदळवाडी प्रभाग क्रमांक एकमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे, पत्राशेड उभारणी जागोजागी होवू लागली आहे. याकडे बांधकाम विभागाचे बीट निरीक्षक, उपअभियंता हे आर्थिक संगणमताने अनधिकृत बांधकामे वाढवण्यास पाठबळ देत आहेत. तसेच नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृतपणे पत्राशेड मारुन भाजी मंडई तयार केली आहे. त्या भाजी मंडई उभारण्यासाठी काही विक्रेत्याकडून आर्थिक व्यवहार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिखली, जाधववाडी आणि कुदळवाडीतील प्रभाग क्रमांक एकमध्ये विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. नगरसेवक सक्षम नसल्याने नागरी समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button