पिंपरी / चिंचवड

घरकुल येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी l प्रतिनिधी

घरकुल येथे अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचाराबाबत कोणास काही सांगितल्यास आई, वडिलांना बघून घेण्याची धमकी दिली. यामध्ये मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला आहे.

साहिल निसर्गंध (रा. घरकुल, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने गुरुवारी (दि. 21) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी पिडीत अल्पवयीन मुलीला घरकुल येथील समाज मंदिरात भेटण्यासाठी बोलावले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर याबाबत घरच्यांना सांगितल्यास आई, वडिलांना बघून घेतो, अशी आरोपीने धमकी दिली. फिर्यादी ही दोन महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button