breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शालेय वह्या खरेदीत भ्रष्टाचार; पुन्हा ‘त्याच’ ठेकेदाराला पुरवठ्याचा आदेश

अतिरिक्त आयुक्तांसह एका गटनेत्यांचा हात, यंदा 75 लाखाहून अधिकच्या वह्या खरेदी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सन 2016-17 आणि 2017-18 च्या सालाकरिता विद्यार्थ्यांना शालेय वह्या खरेदी करण्यात आल्या. तसेच पीटी शूज व शाॅक्स खरेदी निविदांमध्ये अनियमितता आढळून आली असून द्विसदस्यीय समितीने खरेदीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. तरीही यंदा शिक्षण समितीने सन 2019-20 सालामध्ये त्याच ठेकेदारांकडून वह्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे ठेकेदाराची चाैकशी करायची अन्ं दुसरीकडे त्याच ठेकेदाराला वह्या, पीटी शूज, शाॅक्स खरेदी पुरवठ्याचा आदेश दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळाच्या काळात २०१६-१७ आणि 2017-18 च्या सालात शालेय साहित्य खरेदी करण्यात आली. त्यातील वह्या, पीटी शूज, शाॅक्स खरेदीत अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे. वितरित केलेल्या वह्यांच्या पानाची संख्येत तफावत आहे. शाळांच्या पुरवठा केलेल्या साहित्य चलनावर साहित्य मिळाल्याबाबत मुख्याध्यापकांच्या स्वाक्ष-या दिसत नाहीत. चार पैकी तीन निविदाकारांनी राजेश ब्रॅंडचे दर सादर करुन त्यात दोघे एकाच कुटूंबातील दिसून येतात. याशिवाय अन्य गंभीर ताशेरे चाैकशी समितीने ओढले आहेत.

तसेच महापालिकेच्या शिक्षण मंडळ काळातील वह्या, पीटी शूज, शाॅक्स खरेदीत अनियमितता आढळूनही यंदाचे सन 2019-20 च्या सालात पुन्हा वह्या, पीटी शूज, शाॅक्स खरेदी जून्याच ठेकेदारामार्फत करण्यात आलेली आहे. त्या ठेकेदारांची मागील पुरवठा केलेल्या साहित्याची चाैकशी सुरु आहे. तरीही त्या ठेकेदारांवर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि एका गटनेत्यांच्या मर्जीने त्याच पुरवठादाराला काम दिले आहे.

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत सत्तांतर घडून आले. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व भयमुक्त कारभाराचे आश्वासन देऊन भाजपाच्या हाती कारभार आला. मात्र, महापालिकेतील कारभारी बदलले, तरी कारभार मात्र बदलला नसल्याचे निविदाप्रक्रियातील घोटाळे व अनियमिततेवरून अनेकदा समोर आला आहे. भ्रष्ट कारभारामुळे राज्य शासनाने शिक्षण मंडळ बरखास्त केले. आता शिक्षण समिती अस्तित्वात आली, तरी समितीचे पदाधिकारी अळीमिळी गुपचिळी पद्धतीने या प्रकरणात सहभागी असल्याचे दिसून येत आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button