breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्वतःचे घर’ मनीष काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमण्या- पाखरांना अनोखी भेट..!

पिंपरी |

अनेकजण आपला वाढदिवस साजरा करतात, काहीजण वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवितात. परंतू पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी काळभोरनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मनीष काळभोर यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. मनीष काळभोर यांचा १४ जून रोजी वाढदिवस होता. यानिमित्त शहरात त्यांनी चिमण्यांसाठी घरे बसविण्याचा उपक्रम राबविला आहे. शहरातील झाडांवर ही घरटी बसवली असून यामुळे चिमणी या पाखरांना स्वतःचे घर मिळाले आहे. यानिमित्त शहरातून लुप्त होत चाललेल्या चिमण्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. ”या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या” या कवितेच्या चार ओळी या घरच्यांवर लावून एक प्रकारे चिमण्या पाखरांना आवाहनही करण्यात आले आहे.

मनीष काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१४ रोजी सकाळी आठ वाजता मोरया गोसावी मंदिरात अभिषेक करण्यात आला असून देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रार्थना करण्यात आली आहे. तसेच काळभोरनगर येथील मदर तेरेसा होम येथे सकाळी १० वाजता अन्नदान, सकाळी १०.३० वाजता काळभोरनगर, मोहननगर परिसरात सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. सायंकाळी सात वाजता काळभोरनगर जनसंपर्क कार्यालय येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास जगदंब प्रतिष्ठान, राष्ट्र तेज तरुण मंडळ, सी इ ओ ग्रुप, हिंदवी स्वराज्य संघटना, अचानक मित्र मंडळ, खंडेराया मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, एच एस आर स्पोर्ट्स क्लब, चांगभलं प्रतिष्ठान, श्री गणेश प्रसारक ट्रस्ट, सूर्योदय मित्र मंडळ, आदींचे सहकार्य लाभले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button