breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक : खून केल्यानंतर शीर धडावेगळे करून हॉटेलच्या पाठीमागे फेकले

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चऱ्होली रोडवरील हॉटेल नानाश्री अलंकापूरम येथे दोन वेटरने तिसऱ्या वेटर मित्राची किरकोळ वादातून खून केल्याची धक्कायदायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खून केलेल्या मित्राचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले आहे. खूनाची घटना कळू नये म्हणून ते शीर हॉटेलच्या पाठीमागे फेकून देण्यात आले. तर शरीर त्याच ठिकाणी ठेऊन आरोपीने पोबारा केला आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली आहे.

ज्ञानेश्वर अंकुश गवळी (वय २०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिकेत मानसिंग रजपूत आणि राजू सखाराम पावडे (वय १९) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांवरही खुनाचा गुन्हा दिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल नानाश्री अलंकापुरम हे चऱ्होली रोडवर आहे. आरोपी आणि मयत व्यक्ती वेटर म्हणून काम करत होते. रात्रीच्या ते हॉटेलमध्येच राहात होते. तिघांमध्ये दररोज किरकोळ कारणांवरून खटके उडायचे. मध्यरात्री हॉटेल बंद केल्यानंतर मालक घरी निघून गेले. त्यानंतर तिघे जण जेवत होते. त्याचवेळी पुन्हा तिघांमध्ये किरकोळ वाद झाला. जेवणाआधी त्यांनी दारू प्यायली होती. नशेत आरोपी अनिकेत मानसिंग रजपूत आणि राजू सखाराम पावडे यांनी ज्ञानेश्वरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले. यात ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घाबरून गेले त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मयत ज्ञानेश्वरचे शीर धडापासून वेगळे केले. ते हॉटलच्या पाठीमागे फेकून देण्यात आले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button