breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘निवडणुका युद्धाप्रमाणे लढाईच्या असतात, बारामती लोकसभेचे युद्ध आम्ही जिंकणार’; चित्रा वाघ

महाविकास आघाडीने महाराष्ट्र भकास करून टाकला

पुणे : निवडणुका या युद्धाप्रमाणे लढाईच्या असतात व जिंकायच्या देखील असतात. त्याप्रमाणे बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. बारामती लोकसभेचे युद्ध आम्ही जिंकणारच, असा विश्वास भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. त्यांनी बारामती येथे शनिवारी भाजप कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपले मत व्यक्त केले.

बारामती जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. आमच्या तयारीमुळे खासदार सुप्रिया सुळे यांचे दौरे वाढले आहेत. त्यानिमित्ताने त्यांची मतदारांशी भेट होत आहे. पण मलाही इकडे वारंवार यावे लागणार आहे. बारामतीत संघटनात्मक बांधणीसाठी आले असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या.

पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केले असल्याच्या आरोपावर चित्रा वाघ म्हणाल्या की, या दोन्ही ठिकाणी आमच्या स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांनी लोकांनी शिदोरी विकासकामांच्या जोरावर मिळवली आहे. तेथील कौल भाजपच्या बाजूने जात असल्याने हे आरोप केले जात आहेत. चुकीचे होत असेल तर पोलिस यंत्रणा त्यांचे काम करेल. पण या दोन्ही ठिकाणी कमळच फुललेले दिसेल, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

महाविकास आघाडीने महाराष्ट्र भकास करून टाकला होता. परंतु सहा महिन्यांपासून शिवसेना-भाजपचे सक्षम सरकार राज्याला लाभले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आयोग्यसेविका यांना न्याय देण्याचे काम सरकारकडून होईल असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button