breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वृक्ष मित्र, पर्यावरण प्रेमीसाठी कार्यशाळा घ्या

पिंपरी –  महापालिकेच्या वृक्ष मित्र व पर्यावरण प्रेमीसाठी कार्यशाळा आयोजित करावी​,  अशी मागणी नगरसेवक तुषार हिंगे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी वृक्ष संवर्धन या विभागामार्फत पावसाळ्यात वृक्ष लागवड केली जाते. त्यात लोकांचा सहभाग नसतो. त्यामुळे सर्व खर्च करुनसुद्धा त्या वृक्षाची निगा व संवर्धन राखले जात नाही. तरी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील वृक्ष मित्र विविध सामाजिक संघटना व पर्यावरण प्रेमी यांच्यासाठी कार्यशाळा घ्यावी.  या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल. वृक्ष संवर्धन व लागवड ही वाढत्या शहरीकरणासोबत त्याची जनजागृती व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग यांसारख्या अनेक समस्या भेडसावत असताना एक ग्रीन सिटी म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख व्हावी. या माध्यमांतून वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी वृक्ष मित्र व सामाजिक संघटना यांना हातभार मिळेल, असे तुषार हिंगे यांनी म्हटले आहे. ​
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button