breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा शिवसेनेत प्रवेश

प्रदीप गवळी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई : निवडणूक आयोगाने एक आठवड्यापुर्वी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. त्यानंतर आता शिंदे गटात नेत्यांची इनकमिंग वाढली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी यांचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेत्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

लोकांना हवी असलेली या भागातले प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथे केले जाईल हा विश्वास आपल्याला मी देऊ इच्छितो. गेल्या सहा-सात महिन्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केल्यानंतर या राज्यातल्या अगदी जिल्हा जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून शहरातून अनेक लोक अनेक कार्यकर्ते विविध पक्षातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहे. एवढेच नाही तर राज्याच्या बाहेरचे देशभरातले देखील आपले कार्यकर्ते पदाधिकारी राज्य प्रमुख हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button