breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

पिंडीवरचे विंचू असे विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांना जामीन मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकराच्या पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांना स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शशी थरुर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये वादग्रस्त विधान केले होते. मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारुही शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. बेंगळुरु लिट फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या थरुर यांनी आपल्याच पुस्तकातील काही पाने उपस्थितांसमोर वाचून दाखवली होती. यात त्यांनी हा उल्लेख केला होता. या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. या विधानाप्रकरणी शशी थरुर यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीतील न्यायालयात सुनावणी झाली. शुक्रवारी न्यायालयाने शशी थरुर यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

ANI

@ANI

Delhi: Shashi Tharoor appeared before Rouse avenue court in “scorpion sitting on a shivling” remark case. Court grants bail to Tharoor on personal bond of Rs 20,000. Matter will now be heard on July 25 for recording of statement of complainant&BJP leader Rajeev Babbar (file pic)

३५ लोक याविषयी बोलत आहेत

आता याप्रकरणी पुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार आहे. पुढील सुनावणीला तक्रारदार आणि भाजपा नेते राजीव बब्बर यांचा जबाब घेतला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button