TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

चिंचवड पोटनिवडणूक : गोरगरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठीच निवडणुकीच्या रिंगणातः सिद्धिक इस्माईल शेख

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचाराला वेग आला आहे. मतदार संघाचा कायापालट कशा प्रकारे करणार आहोत, याचा जाहिरनामा लोकांपर्यंत पोहोचविण्यात उमेदवार व्यस्त आहेत. गोरगरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासासाठीच निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलो असल्याचे अपना वतन संघटनेचे पुरस्कृत उमेदवार सिद्धिक ईस्माईल शेख यांनी जाहिर केले आहे. सध्या चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदार संघात ‘नेता नव्हे तर बेटा’ म्हणून भेटण्यास येतोय, अशी कॅचलाईन घेऊन शेख यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे.
लहानपणापासून अतिशय खडतर संघर्ष करत आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगताना सिद्धिक इस्माईल शेख म्हणतात की, नोकरी करत असताना परिसरात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी पाहवत नव्हत्या. आपण समाजासाठी, देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, यातून शिव-शाहू -फुले-आंबेडकरांच्या विचारधारेची कास धरून, सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अपना वतन संघटनेची सुरूवात केली. भारतीय संविधानाप्रमाणे देशातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समान न्याय व विकासाच्या संधी मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रशासनासोबत पत्रव्यवहार, आंदोलने व मोर्चाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. चिंचवड पोटनिवडणूकीत विजयी झाल्यास वंचित, गोरगरीब दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासासाठीच निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलो आहे, असे मत सिद्धिक ईस्माईल शेख यांनी आपल्या जाहिरनाम्यात व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button