TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

चिंचवड पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार जावेद रशीद शेख वाकडवाला यांचा प्रचार जोरात!

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक उमेदवार आपण निवडून आल्यानंतर मतदार संघाचा कायापालट कशा प्रकारे करणार आहोत, याचा जाहिरनामा लोकांपर्यंत पोहोचविण्यात व्यस्त आहेत. त्यापैकी जावेद रशीद शेख वाकडवाला यांच्याही प्राचाराचा झंझावात पहायला मिळत आहे. जातीयवादाला छेद देऊन मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा अजेंडा पोहोचविण्याचा मनोदय शेख यांनी व्यक्त केला आहे.

नारळाची बाग हे निवडणूक चिन्ह असलेले शेख यांनी आपल्या जाहिरनाम्यात म्हटले आहे की, आजपर्यंतच्या राजकारण्यांनी केवळ मताच्या हव्यासापोटी राजकारण केले आहे. मतदार संघातील नागरिकांना केवळ आश्वासने दिलेली आहेत. मात्र अजूनही मतदार संघातील अनेकाकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाहीत. ज्येष्ठांना विविध योजना, पेंशन मिळत नाही. आतापर्यंत येथील राजकारण्यांनी जाती-पातीचे राजकारण केले. प्राधीकरणातील 12.5 टक्के परतावे मिळालेले नाहीत. चिंचवड मतदार संघात कब्रस्तानाचा गंभीर प्रश्न आहे. कित्येक वर्षापासूनची ही मागणी प्रलंबित आहे. मदरशांची अवस्था बिकट आहे. आज दाढी, टोपी तसेच मुस्लिम समाजाचे नाव ऐकूनच येथील राजकारणी तिरस्काराची वागणूक देतात. बोटावर मोजण्याइतकेच लोक चांगले आहेत. जे चांगले आहेत ते सत्तेत नाहीत. जे सत्तेत आहेत ते तिरस्कार करतात. याविरोधात आवाज उठविण्यासाठीच आपण ही निवडणूक लोकशाही मार्गाने लढवत असून, चिंचवडकरांच्या सेवेची संधी मिळावी, असे मत जावेद रशीद शेख यांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button