breaking-newsराष्ट्रिय

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा संविधानाचा विजय -कॉंग्रेस

नवी दिल्ली:  सर्वोच्च न्यायालयाने भाजपला उद्या शनिवारी कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊन  दणका दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने आनंद व्यक्त करतानाच हा संविधानाचा विजय असल्याचे म्हटले आहे. तर उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केला आहे.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी असंविधानिक निर्णय घेतला होता, या आमच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालने शिक्कामोर्तब केले आहे, असे ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.  भाजपमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही, हे न्यायालयाच्याही लक्षात आले आहे. कायदेशीर बाबीत भाजप मागे पडला आहे. आता ते साम, दाम, दंड, भेदाचा अवलंब करून बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.

तर आम्ही मुख्य सचिवांशी चर्चा केली असून त्यांना उद्याच अधिवेशन घेण्यास सांगितले आहे. उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू याचा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे, असे येडियुरप्पा यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही बहुमत सिद्ध करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Rahul Gandhi

@RahulGandhi

Today’s Supreme Court order, vindicates our stand that Governor Vala acted unconstitutionally.

The BJP’s bluff that it will form the Govt., even without the numbers, has been called out by the court.

Stopped legally, they will now try money & muscle, to steal the mandate.

Prakash Javadekar

@PrakashJavdekar

BJP is ready and confident of winning trust vote In . We will prove our majority on the floor of the House. @BSYBJP @narendramodi @AmitShah @BJP4Karnataka @BJP4India

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button